logo

आम्रपाली बुद्ध विहारात वाचनालयाची सुरूवात वर्धा/ महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांची जयंती नुकतीच मोठ्या प्रमाणात विविध

आम्रपाली बुद्ध विहारात वाचनालयाची सुरूवात

वर्धा/ महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांची जयंती नुकतीच मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी साजरी केली गेली. त्याच निमित्ताने आम्रपाली बुद्ध विहार येथे बुद्ध वंदना घेऊन साजरी करण्यात आली. त्याचबरोबर बुद्ध यांच्या जीवन चरित्रावर बोलताना श्री.बाराहाते यांनी त्यांच्या जन्माविषयी माहिती विशद केली. त्याचबरोबर कार्यक्रमाची रूपरेषा सांगताना आशिष सोनटक्के अध्यक्ष आत्मनिर्भर बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या पुढाकाराने विविध कार्यक्रम यावेळेस वॉर्ड मध्ये घडून आणले. त्यावेळेस ते म्हणाले की आपले विविध ठिकाणी असलेले बुद्ध विहार हे फक्त १४ एप्रिल बुद्ध जयंती, ६ डिसेंबर ला सुरु असल्याचे दिसून येत आहे.

त्याच बुध्द विहाराला आपण जर शिक्षणाचे माध्यम बनवले तर येणारी पिढी ही मोठ्या पदावर अधिकारी बनून दिसतील. हाच पुढाकार आपण आपल्या आम्रपाली बुद्ध विहार येथे 'आपले विहार आपले वाचनालय' ची सुरुवात करण्यात आली. त्याच बरोबर इतर लोकांनी आम्हाला पुढाकार घेऊन सहकार्य करावे व वाचनालयात भेट द्यावी, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर लहान मुलांसाठी संडे मिशनची ही सुरुवात लवकरच या विहारातून करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे बुद्ध जयंतीचे औचित्य साधून या सर्व कार्यक्रमाची मांडणी करण्यात आल्याचे त्यानी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू शेंडे यांच्यासह वार्ड मधील नागरिकांची उपस्थिती होती.

0
0 views